IIT च्या स्टडीमध्ये आश्चर्यकारक दावा, जलवायु परिवर्तनामुळं भारतातील हवामानावर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामान बदलामुळे भारताला भविष्यात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. ज्याचा पीक उत्पादनावर नकारात्मक परिणाम तर होईलच, यासोबत सिंचनाची मागणी वाढेल आणि भूजलातून पाण्याचा उपसा जास्त होईल. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरमधील संशोधकांच्या अभ्यासानुसार हा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, मातीतील ओलावा वेगाने कमी झाल्याने अचानक दुष्काळाची तीव्रता वाढेल. पारंपारिक दुष्काळाच्या तुलनेत अचानक झालेल्या दुष्काळाचा परिणाम दोन ते तीन आठवड्यांत मोठ्या क्षेत्रावर होऊ शकतो, पिकावर याचा फार वाईट परिणाम होईल आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढेल.

हा अभ्यास एनपीजे क्लायमेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात पावसाळ्यात होणार्‍या दुष्काळात मानवामुळे होणार्‍या हवामान बदलाच्या भूमिकेचे परीक्षण केले आहे . भारतीय हवामान खात्याने आपल्या अभ्यासात गोळा केलेल्या मातीचे नमुने आणि हवामान अंदाजांचा अभ्यासकांनी अभ्यास केला. त्यानुसार समितीने नमूद केले कि, 1951 ते 2016 दरम्यानचा सर्वात भीषण दुष्काळ 1979 मध्ये पडला होता, जेव्हा देशातील 40 टक्क्यांहून अधिक भागावर दुष्परिणाम झाला होता.

आयआयटी गांधीनगर येथील सिव्हिल इंजिनीअरिंगचे असोसिएट प्रोफेसर विमल मिश्रा म्हणाले, ‘मान्सूममधील अंतराने किंवा मान्सूम आगमनाला उशीर झाल्यामुळे भारतात अचानक दुष्काळाची परिस्थिती असल्याचे दिसून आले आहे.