कौतुकास्पद ! IITच्या विद्यार्थीनींनी बनवलं ‘उपकरण’, आता ‘सॅनिटरी पॅड’चा देखील करता येणार ‘पुर्नवापर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या आणि सॅनिटरी पॅड च्या वापरासंबंधी जनजागृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशाच्या विभिन्न ठिकाणच्या ग्रामीण भागात अजूनही महिलांना सॅनिटरी पॅड चा वापर करणे दुर्लभ आहे. तर शहरांमध्ये याच्या अधिक वापरामुळे वाढणारा कचरा एक मोठे आव्हान आहे. एका अहवालात सांगितल्याप्रमाणे एक सिंथेटिक सॅनिटरी पॅड कुजून नष्ट होण्यासाठी तब्बल पाचशे ते आठशे वर्षे एवढा प्रचंड कालावधी लागतो.

या समस्येवर प्रभावी तोडगा काढताना आयआयटी च्या दोन विद्यार्थिनींनी ‘क्लींज राइट’ नावाचे एक उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने पुनर्वापरनीय सॅनिटरी नॅपकिन ला साफ करून पुन्हा एकदा वापरण्याजोगे बनवता येणार आहे. आयआयटी (इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) मुंबई येथील इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग च्या विद्यार्थिनी ऐश्वर्या अग्रवाल, देवयानी मलाडकर यांनी हे उपकरण तयार केले आहे.

या उपकरणाची किंमत त्यांनी १५०० रुपये एवढी निश्चित केली असून त्याचे पेटंट मिळवण्यासाठी देखील अर्ज केला आहे. देवयानी आणि ऐश्वर्याने सांगितले की, महिलांचीच आरोग्याबाबतची जागरूकता वाढल्याने डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड च्या विक्रीमध्ये आणि वापरात वाढ झाली आहे. मात्र अधिकच्या वापरामुळे सॅनिटरी नॅपकिन चा वाढणारा कचरा देखील एक मोठे आव्हान आहे.

अशात ‘क्लींज राइट’ हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार असून पॅडल वर चालत असल्याने त्याच्या वापरासाठी लाईटची देखील गरज नाही. पाण्याच्या साहाय्याने यामध्ये लागलेले रक्त साफ केले जाते. याची विशेषतः म्हणजे लहान मुलांचे कपडे देखील यामध्ये धुता येऊ शकतात. विद्यार्थींनींनी सांगितले की
याच्या वापरामुळे परत वापरले जाऊ शकणारे सॅनिटरी नॅपकिन पूर्णतः सुरक्षित आहे. याच्या वापरामुळे बायोमेडिकल कचरा कमी होणार आहे जे स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त