मोदींच्या ज्या विधानाची राहुल गांधींनी उडविली होती ‘खिल्ली’, IIT नं खरी करून दाखविलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयआयटी, गुवाहाटी येथील संशोधकांनी हायड्रोफोबिसीटी संकल्पनेचा वापर करून हवेपासून (एक्वैरियम) पाणी काढण्यासाठी नवीन तंत्र विकसित केल्याचा दावा केला आहे. रसायनशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक उत्तम मन्ना यांच्या नेतृत्वाखालील एक टीम कौशिक माजी, अविजित दास आणि मंदीपा धार यांनी त्यांचे संशोधन जर्नल ऑफ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित केले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या एका भाषणात विंड टरबाईनच्या सहाय्याने आर्द्र हवेपासून पाणी वेगळे करण्याविषयी बोलले होते, यावर राहुल गांधी आणि अन्य विरोधी नेत्यांनी त्यांची खिल्ली उडविली होती. आयआयटीच्या पथकाने पंतप्रधानांचे हे म्हणणे सत्य करून दाखविले आणि कोणतेही शीतलक न वापरता पाण्याच्या वाफातून पाणी गोळा करण्याचे तंत्र विकसित केले. या प्रसंगी प्राध्यापक मन्ना म्हणाले, “हे पाणी साठवण्याचे तंत्र हायड्रोफोबिसीटी किंवा वॉटर-रिपेलिंग तंत्रावर आधारित आहे. कमळाचे पान पाहून हायड्रोफोबिसिटीची संकल्पना समजू शकते.” ते म्हणाले की प्रथमच आयआयटी-गुवाहाटीच्या संशोधन पथकाने आर्द्र हवेतून पाणी प्रभावीपणे काढण्यासाठी रसायननिर्मित एसएलआयपीएस ही संकल्पना वापरली आहे.

जगभरात वाढत्या पाणीटंचाईमुळे अपारंपरिक माध्यमांद्वारे पाणी संकलन व संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि आयआयटी-गुवाहाटी येथील वैज्ञानिकांनी पाण्याची साठवण करण्याच्या नैसर्गिक पद्धतींकडे लक्ष देणे सुरू केले आहे. प्राध्यापक मन्ना पुढे म्हणाले, “आम्ही एक अत्यंत कार्यक्षम वॉटर हार्वेस्टिंग इंटरफेस तयार केला आहे. संशोधकांनी त्यांच्या पिचर- प्लांट-प्रेरित SLIPS मटेरियलची तुलना इतर जैविक पद्धतींशी केली आहे आणि हे तंत्र जल-संग्रहणीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे आढळले आहे. “