साबण आणि टूथपेस्टमध्ये आढणारा ट्रायक्लोसॅन नर्व्हस सिस्टमवर करतो वाईट परिणाम, IIT हैद्राबादने केला खुलासा

नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) हैद्राबादच्या संशोधकांनी टूथपेस्ट, साबण आणि दुर्गंधी घालवणार्‍या रोजच्या वापरातील उत्पादनांमध्ये आढळणारा ट्रायक्लोसन धोकादायक असल्याचे म्हटले आहे. संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच युनायटेड किंगडममधून प्रकाशित होणारे जर्नल Chemosphere मध्ये प्रकाशित केले होते.

ट्रायक्लोसन एक अँटी बॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल एजंट आहे जो मनुष्याच्या शरीरातील नर्व्हस सिस्टम (मज्जासंस्था) ला प्रभावित करतो. हे रसायन स्वयंपाक घरातील वस्तू आणि कपड्यांमध्ये आढळते.

1960 च्या दशकात याचा वापर केवळ मेडिकल केयर उत्पादनांपर्यंत मर्यादित होता. नुकतेच अमेरिकन एफडीएने ट्रायक्लोसनच्या विरोधात पुराव्यांचा आढावा घेतला होता आणि त्याच्या वापरावर अंशता प्रतिबंध लावला होता.

डॉ. अनामिका भार्गव यांनी म्हटले, या अभ्यासातून समजते की, सूक्ष्म मात्रेत सुद्धा ट्रायक्लोसन न्यूरोट्रान्समिशनशी संबंधित जीन आणि एंजाइमला प्रभावित करू शकतो तसेच न्यूरॉनचे सुद्धा नुकसान करू शकतो. हा एका ऑर्गेनिज्मच्या मोटर फंक्शनला प्रभावित करू शकतो. त्यांनी म्हटले की, मानवी ऊती आणि द्रवपदार्थांमध्ये ट्रायक्लोसनच्या उपस्थितीने मनुष्यांमध्ये न्यूरो-वर्तनात बदल होऊ शकतो, जे पुढे जाऊन न्यूरो-डीजनेरेटिव्ह रोगांशी संबंधीत असू शकते.