Coronavirus : ‘कोरोना’च्या लढाईमध्ये IIT नं 4 दिवसात बनवलं पोर्टेबल ‘व्हेंटीलेटर’, डॉक्टरांच्या सुरक्षेचं खास ‘लक्ष’

कानपुर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या लढाईत आयआयटी कानपूरने चार दिवसांत पोर्टेबल व्हेंटिलेटर बनवून लढाई जिंकण्यात यश मिळवले असून देश आणि जगात या व्हायरसच्या संक्रमित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत सध्या पोर्टेबल व्हेंटिलेटरचा एक नमुना तयार केला आहे. रूग्णांच्या टेस्टिंग नंतर महिनाभरात एक हजार पोर्टेबल व्हेंटिलेटर बनवण्याचे उद्दिष्ट असून यात डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक खास फीचर्स आहेत.

देशातील जगात व्हेंटिलेटरची मागणी वाढली
कोरोनो रुग्णांची संख्या लक्षात घेता देश आणि जगात व्हेंटिलेटरची मागणी वेगाने वाढत आहे. अलीकडेच इटलीमध्ये हजारो कोरोनाने संक्रमित लोकांचा मृत्यू आणि मोठ्या संख्येने रूग्णालयात दाखल होण्यासाठी इतर देशांकडून व्हेंटिलेटरची मागणी केली गेली. परंतु इतर देशही या आजाराशी लढण्यासाठी पुढे आले नाहीत. भारतातील रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर आणि पुरातन विद्यार्थ्यांनी पुढे येत चार दिवसांत पोर्टेबल व्हेंटिलेटरचे एक प्रोटोटाइप मॉडेल तयार केले. आता लवकरच रुग्णांवर त्याची चाचणी घेण्यात येणार असून संस्थेच्या शोधानंतर संचालक प्रो.अभय करंदीकर यांनी संघाला प्रोत्साहन दिले आहे.

एका महिन्यात बनवणार १ हजार पोर्टेबल व्हेंटिलेटर
आयआयटीचे पुरातन विद्यार्थी निखिल कुरेले आणि हर्षित राठोड यांनी आयआयटीच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन हबच्या सहकार्याने पोर्टेबल व्हेंटिलेटरची कल्पना विकसित केली होती आणि त्याचे पेटंट देखील केले. कोरोना विषाणूचा धोका पाहून हबचे प्रभारी प्रा.अमिताभ बंधोपाध्याय यांनी निखिल आणि हर्षित यांच्याशी बोलले आणि दोघेही तयार झाले. आयआयटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा.समीर खांडेकर, प्रा.अरुण साहा, प्रा.जे रामकुमार, प्रा.विशाख भट्टाचार्य यांनी प्रोटोटाइप मॉडेल बनवण्यात टेक्निकल सहकार्य केले. लॉकडाऊन झाल्यामुळे दोन्ही विद्यार्थी संस्थेत येऊ शकले नाहीत. त्यांनी दिवस रात्र एक करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, स्काईप आणि इतर पद्धतीने प्रोटोटाइप मॉडेल बनवले. त्यांच्या कंपनीने इतर काही संस्थांच्या मदतीने लवकरात लवकर अनेक व्हेंटिलेटर तयार करण्याचा निर्णय घेतला असून महिन्याभरात एक हजार पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार करण्याचे लक्ष्य या टीमचे आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी घेतलेली काळजी, मोबाइलने होणार ऑपरेट
कोरोनाची लागण झालेल्या पेशंटद्वारे डॉक्टरांना धोका अधिक असतो. त्यात सर्वात संवेदनशील व्हेंटिलेटर आहे कारण ऑपरेट करण्यासाठी त्याला सतत स्पर्श करावा लागतो. यामुळे डॉक्टरांना धोका असल्यामुळे या पोर्टेबल व्हेंटिलेटरमध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. तज्ञांच्या मते पोर्टेबल व्हेंटिलेटर मोबाईल फोनवरून ऑपरेट होईल, ज्यामध्ये डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी ते एका विशिष्ट अंतरावरून ऑपरेट करू शकतील. ऑक्सिजनसाठी दोन पर्याय आहेत, एक स्लो आणि दुसरा फास्ट. त्यात ऑक्सिजन सिलिंडरही सहज जोडता येत असून ते खूप हलके आणि लहान आहे. यामध्ये एक छोटी बॅटरी देखील आहे. जर काही काळ वीजपुरवठा थांबला, तरीही ते कार्य करत राहील. प्रा.अमिताभ बंडोपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, प्रोटोटाइप तयार असून तो ऑटोमॅटिक आहे. रविवारी व सोमवारी वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.