IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोट मध्ये ‘देहदान’ करा असं सांगितलं

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद येथील आयआयटीमध्ये एमटेकच्या शेवटच्या वर्षाला शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्यांने मंगळवारी हॉस्टेलच्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे हॉस्टेलमध्ये खळबळ उडाली असून आयआयटीतीली यावर्षातील ही दुसरी घटना आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आठ पानाची चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये त्याने देहदान करण्याची विनंती केली आहे.

मार्क एंड्र्यू चार्ल्स असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो वाराणसी येथील रहीवाशी आहे. परिक्षेमध्ये मार्क कमी पडल्यामुळे चांगली नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहे. तसेच एकदाच आयुष्य मिळते ते आयुष्य तुम्ही वाया घालवू नका त्यामुळे तुम्ही आयुष्य जगा असा संदेश त्याने आपल्या मित्रांना दिला आहे.

मार्कने लिहले ‘मी ठीक नाही’
मार्कने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत लिहले आहे की, माझ्याकडे कोणतीच नोकरी नाही आणि कदाचित मला नोकरी मिळणार नाही. कोणत्याही अपयशी व्यक्तीला नोकरी मिळत नाही. मी माझे प्रगतीपुस्तक पाहून अचंबीत झालो आहे. सगळ्यांसारखे माझे ही काही स्वप्न होते. मात्र आता सगळे संपले आहे. मी ठीक नसताना देखील चेहऱ्यावर हास्य ठेवायचे आणि लोकांना ठीक असल्याचे सांगायचे पण मी ठीक नाही.

देहदान करण्याची विनंती
मार्कने लिहलेल्या चिठ्ठीत परिवाराची आणि मित्रांची माफी मागून, मी तुम्हाला अशाप्रकारे नाराज करेन असा विचार देखील केला नव्हता. तुम्ही माझी आठवण काढावी अशी माझी पात्रता नाही. दोन वर्ष घरापासून दूर राहुन देखील माझ्या जवळपास अनेक चांगली लोक आहेत. मी एका चांगल्या इंस्टीट्यूट मध्ये आहे मात्र मी सर्व काही वाया घलवले.

मार्कने चिठ्ठीमध्ये आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने आपल्या परिवाला विनंती केली आहे की माझ्या मृतदेहावर अंतीम संस्कार न करता माझा मृतदेह वैद्यकीय विद्यालयाला दान करावा. कमीत कमी मी नाही तर माझा मृतदेह तरी या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावी डॉक्टरांना उपयोगी पडेल.
आयटीमध्ये आपले आयुष्य वाया घालवू नका

आपल्या मित्रांना आवाहन करत माफी मागितली आहे. मित्रांना आवाहन करताना त्याने आयटी इंडस्ट्रीमध्ये आपले आयुष्य वाया घालवू नका. आपल्या काही मित्रांची नावे लिहून त्याने म्हटले आहे की, अंकीत, रज्जो आयटीमध्ये काम करत असताना आपले खरे आयुष्य विसरू नका. आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्ही जगा कारण आयुष्य एकदाच मिळते.

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती