home page top 1

नाकाबंदीदरम्यान पिकअपच्या धडकेत जखमी पोलिसाचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – म्हसरुळ येथे दोन दिवसांपुर्वी पिकअप व्हॅनने धडक दिल्याने जखमी झालेल्या दोन बीट मार्शलपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २ एप्रिल रोजी हा अपघात झाला होता.

नंदू जाधव असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर राजेश लोखंडे त्यांच्यासोबत जखमी झाले होते.

सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पोलीस म्हसरूळ येथे दुचाकीसह बॅरिकेटींग करून उभे होते. त्यावेळी एमएच १७ बी वाय ९०७० हा पिकअप पेठ रोडवरील राहू हॉटेल चौकातून जात होता. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या टेम्पोला चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि नाकाबंदी करणाऱ्या नंदू जाधव आणि राजेश लोखंडे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यात दोघेही जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान नंदू जाधव यांचा मृत्यू झाला.

Loading...
You might also like