ICC World Cup 2019 : अफगानिस्तानच्या ‘या’ खेळाडूनं मोडलं सचिन तेंडुलकरचं ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप मध्ये काल वेस्टइंडीज आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात मोठ्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला असून यामध्ये अफगाणिस्तानचा सलामीवीर इकराम अली खिल याच्या नावावर देखील एक विक्रम नोंदविला गेला आहे. इकराम अली खिल याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडताना विंडीजविरुद्ध शानदार ८६ धावांची खेळी केली. यावेळी त्याने सर्वात कमी वयात वर्ल्डकपमध्ये जास्त धावांची खेळी करण्याचा पराक्रम केला. याआगोदर हा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये सचिनने वयाच्या केवळ १८ व्या वर्षी हा रेकॉर्ड केला होता. त्यावेळी सचिनचे वय १८ वर्ष ३२३ दिवस होते. त्यावेळी सचिन तेंडुलकरने ८४ धावा केल्या होत्या.

१) २०१९ वर्ल्डकपमध्ये इकराम अली खिल याने वेस्ट इंडिजविरुद्ध ८६ धावा केल्या. यावेळी त्याचे वय आहे १८ वर्ष २७८ दिवस

२) १९९२ वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकर याने न्यूझीलंडविरुद्ध ८४ धावा केल्या. यावेळी त्याचे वय १८ वर्ष ३२३ दिवस होते.

३) १९९२ वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकर याने जिम्बाब्वे विरुद्ध ८१ धावा केल्या. यावेळी त्याचे वय १८ वर्ष ३१८ दिवस होते.

दरम्यान, इकराम अली खिल याला वर्ल्डकप स्पर्धेच्या मध्यातच इंग्लंडला बोलावण्यात आले होते. अफगाणिस्तानने त्याला मोहम्मद शहजादच्या जागेवर संघात स्थान दिले होते. सर्वात कमी वयात विकेटकिपर म्हणून वर्ल्डकपमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याने केला आहे. याआधी हा रेकॉर्ड बांग्लादेशच्या मुश्फिकुर रहीम याच्या नावावर होता.

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय