Photos : ‘बॉडी शेमिंग’वर खुलून बोलली अभिनेत्री इलियाना डिक्रूज, म्हणाली- ‘आरशात बघते आणि विचार करते…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) अनेकवेळा आपल्या बोल्ड फोटो आणि हॉट अवतारामुळं चर्चेत आली आहे. आपल्या हॉटनेससाठी ती सोशल मीडियावर फेमस आहे. अनेकदा ती आपल्या फिगरमुळं ट्रोलही झाली आहे. इकतंच नाही तर ती अनेकदा बॉडी शेमिंगचीही शिकार झाली आहे. इलियानानं आता एका मुलाखतीत बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगवर खुलून भाष्य केलं आहे.

‘अनेकदा असं होतं की, मी स्वत:ला आरशात बघते आणि निराश होते’

एका मुलाखतीत बोलताना इलियाना म्हणाली, तुमची साईज काहीही असू देत, आपल्याला नेहमीच स्वत:मध्ये कमतरता दिसते. अनेकदा असं होतं की, मी स्वत:ला आरशात बघते आणि निराश होते असं इलियाना म्हणाली.

‘आता मी आरशात बघताना असा विचार करते’

पुढं बोलताना इलियानानं सांगितलं की, आता मी आरशात बघताना असा विचार करते, माझ्यामधलं ते कोणतं फीचर आहे जे मला आवडतं आणि ज्यावर मी प्रेम करते. जे स्वत:मध्ये कायमच कमतरता पाहत असतात त्यांनी हे नक्की ट्राय करावं असं मला वाटतं असा सल्लाही त्यांनी चाहत्यांना दिला. ती अनेकदा इतरांना प्रेरणा मिळेल अशा पोस्टही सोशलवर शेअर करताना दिसत असते.

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती अनफेअर अँड लवली या सनेमात काम करणार आहे. सिनेमात तिच्यासोबत रणदीप हुड्डाही दिसणार आहे. तो पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारत आहे. इलियाना अजय देवगण निर्मित द बिग बुल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत काम करताना दिसली आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज झालाआहे. काही दिवसांपूर्वीच ती पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात इलियाना, जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा, अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता. इलियानानं बादशाहो, रेड अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.