Ileana Dcruz | पहिल्यांदाच झळकणार विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझची जोडी! अभिनेत्रीनं वेगळ्याच अंदाजात व्यक्त केला आनंद

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  विद्या बालन (Vidya Balan) ही नेहमी तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्याऱ्या कथात्माकांसाठी ओळखली जाते. तिचे चित्रपट हे सामाजिक जीवनाशी नव्याने ओळख करून देणारे असतात. इलियाना डिक्रूझ (Ileana Dcruz) ही काही कालावधीपासून बॉलीवूड (Bollywood) सिनेसृष्टी पासून लांब होती. आता ती अभिनेत्री विद्या बालन सोबत एका ड्रामा कॉमेडी स्वरूपाच्या चित्रपटा मधून बॉलीवूड मध्ये ‘रि एन्ट्री’ करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल. विद्या बालन आणि इलियाना (Ileana Dcruz) या दोघी प्रेक्षकांना पहिल्यांदाच एकत्रित पणे मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांच्या मनात याबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

 

इलियानाने (विद्या) तिच्या इंस्टाग्राम पोस्ट द्वारे तिच्या आगामी चित्रपटाबद्दल लिहले; “हे जाहीर करण्यासाठी मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते.
या चित्रपटाबद्दल आणि या विद्या बालन, प्रतीक गांधी, रामा सेंधील या सुंदर कलाकारांसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

 

हा चित्रपट शिर्षा दिग्दर्शित करत आहे याचा मला मला खूप आनंद झाला आहे कारण तिला नेमके काय हवे आहे ते तिला माहित आहे
आणि ती नक्कीच माझ्या अभिनयतल्या सर्वोत्तम बाबी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना दाखवेल .
त्याचप्रमाणे मी चित्रपटाचे निर्माते @applausesocial आणि @ellipsisentertainment यांनाही धन्यवाद बोलू इच्छिते की त्यांनी अशा वास्तविक,
आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या विषयाला अनुसरून हा चित्रपट तयार केला.

 

या चित्रपटाचे चित्रीकरण हे मुंबई आणि उटी मध्ये होणार असून पुढील वर्षी हा बहुचार्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Web Title : Ileana Dcruz | ileana dcruz vidya balan first film together announced scam 1992 fame pratik gandhi and sendhil ramamurthy join

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! 15 वर्षाच्या मुलीने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, मागितली 5 लाखांची खंडणी

Bad Food For Kidney | तुमची किडनी खराब करतात ‘या’ 5 गोष्टी, मर्यादित करा सेवन; जाणून घ्या नुकसान

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मोठा फेरबदल, सोने 1000 रूपयांनी स्वस्त तर चांदी 4000 रुपयांनी महाग