धक्कादायक खुलासा ! बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करत होती आत्महत्या करण्याचा विचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या चित्रपटांमधून गायब असलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज जरी चित्रपटाद्वारे चर्चेत नसली तरी एका कारणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. अभिनेत्री इलियानाने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. जसे की, ‘रुस्तम’, ‘रेड’, ‘बर्फी’, ‘बाहशाहो’ इ. सध्या तिने चित्रपटांना ब्रेक दिला आहे. कारण इलियाना एका आजाराने त्रस्त होती त्यामुळे तिने चित्रपटातमधून थोडा ब्रेक घेतला आहे. याचा खुलासा स्वत: अभिनेत्री इलियानाने केला आहे.

तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ती बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर या आजाराची शिकार होती. त्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या मनात रोज आत्महत्या करण्याचा विचार येत होता. ती खूप विचार करत होती आणि विचार करुन ती खूप नाराज होत होती. तिला असे वाटायचे की कोणी तिचा स्विकार करणार नाही. काही काळानंतर तिने आजार आपल्याला आहे हे मान्य केले आणि नंतर कोणताच विचार न करता ती सामान्य जीवन जगू लागली.

इलियाना याआधी तिच्या स्टेटमेंटमुळे चर्चेत आली होती आणि त्यामध्ये तिने आपल्या ब्रेकअपबद्दल देखील सांगितले होते. ती म्हणाली की, ती ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अ‍ॅँड्रयू निबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यांच्यामध्ये सारखे वाद होत होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना कंटाळून ब्रेकअप केला.

इलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर, लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘पागलपंती’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये इलियानासोबत अभिनेता जॉन अब्राहम, अनिल कपूर, अभिनेत्री उर्वशी रौतेला, अरशद वारसी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.