गोमांस वाहतूक करणारा ट्रक जप्त ; दोघांना अटक

यवत पोलिसांची धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे सोलापूर महामार्गावरील यवत येथे गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दावलमलिक साईबाबा मुल्ला आणि खलील सयपण कुरेशी (दोघेही रा. सोलापूर) या आरोपींना यवत पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर राजेंद्र स्वामी (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हे यवत गावच्या हद्दीतून ट्रक नंबर एम.एच.१३/ सी.यु./३५११ या मध्ये गाई व बैलाचे कापलेले मांस घेऊन जात असताना त्यांना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना ट्रकमध्ये गोमांस भरून ते वाहतूक करीत असल्याचे समोर आले. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम १९९५ कलम ५ क, ९ ब , ९ अ, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास यवतचे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करत आहेत.