अवैध गोमांस धुळे पोलीसांकडून जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – गायीसह बैलांचे बेकायदा कत्तल करून विकले जाणारे मास धुळे पोलीसांनी जप्त केले आहे. बेकायदा मास वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील आझाद नगर पोलिस ठाणे हद्दीतील माधवपुरा परीसरातील अलजोहरा क्लिनीकसमोरील नियाज अन्सारी या संशयीताच्या वाड्यावर सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास छापा टाकला. तेथून १० लाख ५१ हजार ८२२ रुपये किंमतीचे गाय व बैलाचे मांस तसेच १६ जिवंत गुरे व एक लाख ६६ हजार ८२० रुपयांच्या रोकडसह मांस वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे पिकअप बोलेरो वाहन जप्त केले.

या कारवाईमुळे अवैधरीत्या गुरांची कत्तल करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून फैसल खान फारुख खान यास अटक करण्यात आली असून संशयीत आरोपी नियाज अन्सारी (धुळे) आणि सलमान खान (मालेगाव) यांच्यासह अन्य चार हेल्पर पसार झाले आहेत. संशयीतांविरुद्ध महेंद्र कापूरे यांच्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़. पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

You might also like