Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane | ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत 30 दिवसांच्या आत कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane | ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात (Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane) कारवाई करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल. सदर समितीमार्फत या विषयाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही ३० दिवसांच्या आत करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत (Maharashtra Industries Minister Uday Samant) यांनी विधानसभेत (Vidhansabha) सांगितले.

सदस्य गणपत गायकवाड (Thane BJP MLA Ganpat Gaikwad) यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य प्रमोद पाटील (Kalyan Rural MNS MLA Pramod (Raju) Ratan Patil), प्राजक्त तनपुरे (Rahuri NCP MLA Prajakt Tanpure) यांनीही प्रश्न उपस्थित केले. (Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane)

सामंत म्हणाले की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात २७ गावांतील २७ बांधकाम परवानगी पत्र
तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागातील ३८ बांधकाम परवानगी पत्र असे एकूण ६५ बांधकाम परवानगी पत्र
बनावट असल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे.
या सर्व परवानगी पत्रांची पडताळणी करण्यात आली असून सदर बांधकाम परवानगी पत्रे महापालिकेच्या
नगररचना विभागाने दिलेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये
(Manpada Police Station) २७ बांधकाम परवानगीबाबत तर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये ३८ बांधकाम
परवानगीबाबत परवानगी पत्रावरील नमूद विकासक आणि वास्तुविशारद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले
आहेत. या प्रकरणात पोलीस विभागामार्फत (Thane Police) विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून
त्यांच्यामार्फत पुढील तपास सुरु आहे. याशिवाय ६५ प्रकरणातील प्रकल्प नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
तसेच रेरा कायद्याच्या तरतूदीनुसार संबंधित बँकांना सदर विकासाची बँक खाते गोठविण्याबाबत कळविण्यात
आले आहे. आतापर्यंत १४ विकासकांना अटक आणि ४२ आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

Web Title :-  Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane Action will be taken within 30 days through the Collector’s committee regarding the unauthorized construction within Kalyan Dombivli Municipal Corporation limits of Thane district – Minister Uday Samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार