नांदेड पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम अवैध मटका व्यवसाय सुरू  

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड शहरात अवैध धंद्याला ऊत आला आहे. ठिकठिकाणी मटका अड्डे हे रोजरासपणे चालू आहेत.  काही मटका अड्डे तर पोलिस अधिक्षक कार्यालयाच्याच  मागे सुरू आहेत  असे असताना  देखील पोलीस प्रशासन मात्र ढीम्म आहे.

‘चॅम्पियन’ ड्वेन ब्राव्होची तडकाफडकी निवृत्ती

नांदेडच्या कला मंदीर , मिलगेट,गोकुळ नगर,वर्क शॉप,खडकपूरा आदी भागात मटका व्यवसायाने आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत .  दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीने  स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यात मटका खेळणारे व लावणारे बुकी सापडले आहेत. स्थानिक पोलिसांना हा प्रकार माहित असून देखील त्यांच्याकडून याकडे  दुर्लक्ष केलं जात आहे. स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना  याबाबत कोणत्याही प्रकारची  खरी माहीत दिली जात नसल्याने मटका अड्डे सुरू आहेत.अशाप्रकारे न्यायालयाच्या नियमावलीलाच पायदळी तुडवण्याचे काम पोलीस करत आहेत.  नांदेडचे हे चित्र कधी  बदलणार याविषयी  उलट सुलट चर्चा नांदेडच्या नागरिकांमध्ये  सुरू आहे.

नांदेडमध्ये ग्रामीण व शहरी भागात तसेच गल्लीबोळात मटका अड्डे  सुरु आहेत.  अवैध धंदे  चालवणाऱ्यांना  नक्की  कोणाच पाठबळ आहे याविषयी  नागरिकांमध्ये चर्चा आहे .काही मटका अड्डे तर पोलिस कार्यालयाच्या  मागेच चालतात तर काही कला मंदिराच्या बाजूला चालतात पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची  कारवाई  मात्र होताना दिसत नाही .

चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या  बाजूला मटका धंदे चालवणारी  दुकाने  नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात  सुरू आहे याविषयी नागरिकांतून कुजबुज सुरु असते  पण ह्या मटक्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त  होत आहेत त्यामुळे या गोष्टींकडे  पोलीस प्रशासनाणे  लक्ष दिले तर अनेकांचे संसार  उध्वस्त होणे थांबेल अशी देखील चर्चा नांदेड शहरात होत आहे.
मटका अड्डे  चालवणाऱ्या  लोकांवर  पोलीस काय कारवाई करतील तसेच नांदेड शहरात नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मटका बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन काय  उपाययोजना करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागून  आहे.

जाहीरात