ATS कडून ‘इंटरनॅशनल टेलिफोन एक्सचेंज’ कॉल सेंटरचा ‘पर्दाफाश’, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडून एका बेकायदेशी आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला असून या कॉल सेंटरचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.

याप्रकरणी मुंबईतील ६ ठिकाणी एटीएसने धाडी टाकून ७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लॅपटॉप, ७ राऊटर, २ सर्व्हर, ११ मोबाईल फोन असा साडेसहा लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ५१३ सीमकार्डस मिळाली आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सीमकार्ड मिळाल्याने देशविरोधी कृत्ये होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

एटीएसला ९ ऑगस्ट रोजी भारतात बेकायदेशीर कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार वरळी, पनवेल, शिवाजीनगर, डोंगरी, मशीद बंदर, कल्यण या ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून ७ जणांना अटक केली आहे. या रॅकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कॉल करून ते इतर राज्यात वळविण्यात येत होते.

या ठिकाणांहून कतार, कुवेत या आखाती देशातून कॉल दुसरीकडे वळवण्यात येत होते. या ठिकाणाहून ३७ कोटींचा बेकायदेशीर व्यवहार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांशी यांचा संबंध असल्याचा संशय असल्याने त्या दिशेने तपास सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –