अवैध प्रवासी, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणार्‍या 4 हजार 874 रिक्षांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उचला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणा-या चार हजार 874 रिक्षांवर कारवाई केली असून यातून 11 लाख 67 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 165 अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अनेक वेळेला कार चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या प्रवासी वाहतूक करतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवून वाहतूक केली जाते. यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. या वाहन चालकांवर वचक निर्माण होण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

एक जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत क्षमेतपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करणा-या चार हजार 874 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर 11 लाख 67 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणा-या 165 अन्य वाहनांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. “कारवाईची ही मोहीम यापुढे देखील सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

You might also like