बेकायदा संपत्ती जमविल्याप्रकरणी ‘तो’ अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरूध्द सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सहाय्यक वनसंरक्षक व त्याच्या पत्नीविरुद्ध बेकायदा संपत्ती जमविल्याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत अपसंपदा असल्याचे उघड झाल्यानंतर फिर्याद देण्यात आली.

केशव रभाजी फंड (वय 56, सहा. वन संरक्षक, वर्ग 1. रा:- सुपा, ता:- पारनेर जि:- अहमदनगर), सविता केशव फंड (वय 50, गृहिणी, रा:- सुपा, ता:- पारनेर, जि:- अहमदनगर) गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, केशव फंड हे महाराष्ट्र शासन सेवेत सहाय्यक लागवड अधिकारी म्हणून सन 1984 मध्ये रुजू झाले आहेत. त्यांनी त्यांचे सन 1984 ते 2014 या सेवाकालावधीत सर्व ज्ञात कायदेशीर उत्पन्नातून मिळविललेली एकूण मालमत्ता व त्या कालावधीतील त्यांचा व त्यांचे कुटुंबियांचा एकुण खर्च यांचा तौलनिक अभ्यास केला असता, त्यांनी सन 2000 मध्ये 24 %, सन 2003 मध्ये 4 % सन 2005 मध्ये 55 % इतकी उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता (अपसंपदा) प्राप्त केली असल्याचे मालमत्तेचे उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.

तसेच सदरची अपसंपदा प्राप्त करणेकरिता त्यांच्या पत्नीने प्रोत्साहन दिले म्हणून दोघांविरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे आज भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –