मुंबईतील IAS, IPS अधिकाऱ्यांच्या हाय प्रोफाइल सोसायटीतील ‘सेक्स’ रॅकेटचा ‘पर्दाफाश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील ओशिवरा भागातील पाटलीपुत्र सोसायटी येथील फ्लॅटवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या पथकाने केला आहे. पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून हे रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. पाटलीपुत्र सोसायटीमधील बहुतेक फ्लॅट हायप्रोफाइल आयएएस, आयपीएस आणि ज्येष्ठ नोकरशहा यांसारख्या लोकांचे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने मंगळवारी उशिरा पाटलीपुत्र सोसायटीतील गॅलेक्सी बिल्डिंगच्या फ्लॅटवर छापा टाकला आणि 21 आणि 19 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना सुटका करून रोख रक्कम जप्त केली. तसेच शबाना शेख (वय 45) या रॅकेट चालवणाऱ्या महिलेला बेकायदेशीर व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत अटक केली असून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला कोठडी सुनावली आहे. तर सुटका करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी महिला सुधार गृहात करण्यात आली आहे. पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हाय प्रोफाइल ठिकाणी सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिली घटना नाही. जून 2014 मध्ये पोलिसांच्यानी पाटलीपुत्र सोसायटीमधील फ्लॅटवर छापा टाकला होता. हा फ्लॅट भाजप खासदार आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांचा होता. जो त्यांनी भाड्याने दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त –