संचारबंदीतही दारू अवैध विक्री जोरात

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  एकीकडे कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक निर्बंध लागू असुन सर्व व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून दिलेले आहे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असताना लासलगाव शहरात अवैध दारू विक्री चे अड्डे मात्र संचारबंदीतही अगदी जोरात सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय व तळीरामांना वेगळा न्याय का असा सवाल लासलगाव पोलिसांना सर्वसाधारण नागरिक विचारू लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मोठ्या झपाट्याने वाढत असल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी गेल्या दहा दिवसापूर्वी कडक निर्बंध जिल्ह्यात लागू केले होते संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. तर महाराष्ट्रात येत्या तीस तारखेपर्यंत खडक निर्बंध लागू केले आहेत.

अशा परिस्थितीत लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीत शहरात पाच ते सहा ठिकाणी अवैध दारू विक्रीचे छुपे अड्डे मात्र या संचारबंदी च्या काळातही जोरात सुरू आहेत. सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे दुकान उघडे असले की त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असताना व नियमांकडे बोट दाखवून पोलीसी खाक्या दाखवणारे पोलीस अवैध दारू विक्रेत्यांवर इतके मेहरबान का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शहरा जवळ असलेल्या श्री महावीर शाळेच्या आसपास दारूच्या अड्ड्यावर दररोज तळीरामांची मोठी गर्दी असल्याने परिसरातील महिला व नागरिक भयभीत झाल्या आहेत या ठिकाणी अनेक मारामारीचे प्रकार घडत असून त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे इतकेच काय कमी असताना पोलीस ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत अशा पोलीस लाईन च्या पाठीमागे अगदी खेटूनच दारूचा अड्डा सुरू असल्याने पोलीस याकडे अगदी ठरवून डोळेझाक करीत असल्याची चर्चा या निमित्ताने शहरात सुरु आहे. लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीत पिंपळगाव नजीक, देवगाव, खेडले झुंगे ,खडक माळेगाव, टाकळी विंचूर, रेल्वे स्टेशन परिसर आदीसह छोट्या-मोठ्या गावात अनेक छुपे दारू विक्रेते तयार झालेले असल्याने ग्रामीण भागातही याचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले आहे.

नाशिकचे अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात जोरदार मोहीम मध्यंतरी उघडली होती मात्र आता संचार बंदी च्या काळातही पोलिसांच्या नाकावर टिच्चून ग्रामीण भागात अवैध दारू विक्री सारखे अनेक धंदे जोमाने वाढत असताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.