वाळू चोरी करणाऱ्या सहा ट्रक चालक-मालकांवर गुन्हे

शहर वाहतुक विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाळू चोरून आणल्याप्रकरणी सहा ट्रक चालक व मालकांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

Advt.

एमएच १४, डीएम ०७७८ या ट्रकवरील चालक उमेश मनोज कदम (२९, पाटस) व मालक दादा गिरमकर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), एमएच ४२ बी ८७३१ वरील चालक दत्तात्रय गोविंद नांदखीले (३६, नांदखीले गाव), एमएच १२ एल टी ७०५५ वरील चालक गणेश ठुंबरे, एमएच १२, केपी ४७३१ वरील चालक मालक गोरख सुरेश कामठे (४१, फुरसुंगी), एमएच ४२, ७१२ वरील चालक बाळू निवृत्ती पाटोळे (५५, दौंड), एमछे ४२, बी ९८७७ वरील चालक शाम निवृत्ती सोनवणे व मालक गिरीष अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास शेवाळवाडी येथे सहा वाळूचे ट्रक उभे असलेले दिसले. यांमध्ये १५.५ ब्रास वजनाची ७७ हजार ५०० रुपयांची वाळू आढळून आली. या वाळू संदर्भात ट्रकचालकांकडे चौकशी केल्यानंतर ती कोठून आणली याची विचारणा करून त्यांच्याकडे कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. मात्र, चालकांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे व माहिती देता आली नाही. ही वाळू चोरून आणल्याची खात्री झाल्याने चालक व मालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.डी.गाडे करत आहेत.