अवैधरित्या वाळु वाहतुक करणारा ट्रक जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याभरात वाळु उपसावर बंदी असतांनाही चोरट्यामार्गाने अवैध रित्या वाहतुक करणारा ट्रक आझाद नगर पोलीसांनी जप्त केला आहे. 

अवैध रित्या वाहतुक करणारा ट्रक आग्रा रोडवर पारोळा चौफुली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत पिवळा रंगाच्या मालट्रक एमएच ०४ एफपी ११६५ जप्त केला आहे. करडीकाळ्या रंगाची ताडपञी टाकुन ४ ब्रास वाळु भरुन पारोळा रोड कडुन शहर हद्दीच्या बाहेर जात असताना आग्रा रोडवर पारोळा चौफुली दरम्यान ट्रकचा पोलीसांनी पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी ट्रेकला थांबावुन चालक गोरख राजु पवार ला विचारपुस केली. दरम्यान चालकाकडे वाळु वाहतुक परवाना नसल्याचे समोर समर आले. त्यावेळी अवैध रित्या चोरटी वाळुची वाहतुक केल्या प्रकरणी पोलीसांनी ट्रेकला आणि चालका ताब्यात घेतले. त्यावेळी १ लाख ३२ हजाराचा माल आझाद नगर पोलीसांनी जप्त केला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.