पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील नदीपात्रातून अनाधिकृत वाळू उपसा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पांडेश्वर गावातील चव्हाण वस्ती लगत नदीपात्रातून दोन जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या साह्याने बाळासाहेब निवगुणे, रा. गारदौड, ता. दौड, जि. पुणे, हे अनाधिकृत वाळू उपसा करून प्रमोद वसंत उमरदंड यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये साठा करून ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे.

मा. तहसिलदार सो. श्रीमती रुपाली सरनोबत व सहा. पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या संयुक्त पथकाने सोमवार दि.३०/१२/२०१९ रोजी रात्रौ १०:२० वाजण्याच्या सुमारास मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकला तेथे अंदाजे ३३ ब्रास वाळू चोरून उपसा केलेला आढळून आला. सदर कारवाई मध्ये दोन जेसीबी मशीन, चार ट्रॅक्टर व अंदाजे ३३ ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आलेला आहे. यातील जप्त केलेली वाहने जेजुरी पोलिस स्टेशनला लावण्यात आलेली असून संबंधीत आरोपींवर मा. तहसीलदार मॅडम पुरंदर यांच्या आदेशानुसार पुढील योग्य ती कारवाई करत आहोत.