उस्मानाबादजवळ उंटांची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

अवैधरित्या १४ उंटांची वाहतूक करणारा ट्रक उस्मानाबाद पोलिसांनी जप्त केला आहे. हे उंट राजस्थानमधून आणलेल्या १४ उटांपैकी दोन उटांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. हे सर्व उंट हैद्राबाद येथील कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याची माहिती आहे.
[amazon_link asins=’B01N0WVC16,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7068c38d-b38b-11e8-8573-57aedb32fa17′]

राजस्थानहून आणलेले हे उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून उस्मानाबादजवळ ट्रक अडवला. पोलिसांनी अडवलेल्या या ट्रकमध्ये 14 उंट होते. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार दोन गाड्यांमध्ये 27 उंट होते. यातील एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यातील 14 उंटांपैकी दोन उंटांचा वाहतुकीदरम्यान मृत्यू झाला आहे. तर तीन उंट गंभीर जखमी आहेत.
[amazon_link asins=’B07B6SN496,B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d253f20-b38b-11e8-937c-19357c2bd453′][amazon_link asins=’B07B6SN496,B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d8fe84e-b38b-11e8-8d7e-fb500c5c1dc2′]

विश्व हिंदू परिषदेला याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय. पोलिसांकडून आता दुसऱ्या ट्रकचा शोध घेतला जात आहे. उंटांची अशा पद्धतीने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने यामागे एखादं मोठं रॅकेट आहे का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी