‘त्या’ ठेकेदारांचा मनपा अधिकार्‍यांच्या संगनमताने भ्रष्टाचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नव्याने समाविष्ट झालेल्या तीन गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने निविदा काढून नेमलेले र्टॅकर ठेकेदार प्रत्यक्षात या टँकरद्वारे शहराच्या अन्य भागातील सोसायट्या आणि कंपन्यांना पाणी विकत आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने हा प्रकार असून पाण्याच्या माध्यमातून सुरू असलेला भ्रष्टाचार त्वरीत थांबवावा, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. याप्रसंगी खाजगी टँकर मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, की महापालिकेने देवाची उरूळी, फुरसुंगी व शेवाळवाडी या तीन गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी निविदा काढून टँकर सुरू केले आहेत. शिवरकर आणि जाधव नावाच्या व्यक्तिंना याचा ठेका मिळाला आहे. रामटेकडी येथील टँकर पॉईंटवर हे टँकर भरले जातात. परंतू या व्यक्तिंनी महापालिकेकडे नोंदविलेल्या टँकरचा पाठलाग केल्यानंतर हे टँकर उंड्री, एनआयबीएम येथील खाजगी सोसायट्या, खराडीतील एका प्रतिथयश कंपनीला पुरविण्यात येत असल्याचे दिसून आले. याचे ङ्गोटोग्राफ्स तसेच संबधित सोसायट्यांमधील टँकरच्या नोंदीच आम्ही मिळविल्या आहेत.

महापालिकेकडून पाणी घ्यायचे तसेच ठेक्याच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचे बीलही घ्यायचे, तेच टँकर खाजगी सोसायट्यांना विकून त्यांच्याकडूनही पैसे घ्यायचे असा राजरोस धंदा सुरू आहे. याला संबधित टँकर भरणा केंद्रावरील महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पाठींबा आहे. त्यामुळेच या टँकरच्या जीपीआरएसच्या नोंदी घेतल्या जात नाहीत. याउलट महापालिकेकडून पाणी विकत घेउन त्याची विक्री करणार्‍या इतर खाजगी ठेकेदारांना मात्र टँकर केंद्रांवर वेळेत पासेस दिले जात नाहीत. खाजगी टँकर मालकांनी महापालिकेच्या सांगण्यावरून मागीलवर्षी टँकरला जीपीआरएस यंत्रणा बसविली आहे. परंतू आता वरिष्ठ अधिकारी देशमुख नावाच्या व्यक्तिकडून पुन्हा नवीन जीपीआरएस यंत्रणा बसवावी असे सांगत ठेकेदारांची पिळवणूक करत आहेत. केवळ अधिकार्‍यांचे पितळ उघडे पडू नये आणि सध्या सुरू असलेला भ्रष्टाचार कायम राहावा यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत.

महापालिका आयुक्तांनी संबधित ठेकेदारांचे पाणी पुरवठ्याचा ठेका रद्द करावा आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी. टँकर भरणा केंद्रांवरील कर्मचार्‍यांचीही बदली करावी. अन्यथा मनसे आणि खाजगी टँकर मालक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मोरे यांनी यावेळी दिला.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

Loading...
You might also like