अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या 26 वर्षीय मुलाला आईनं संपवलं अन्….

गुरदासपूर : वृत्तसंस्था – गुरदासपूरच्या गावातील एका नाल्यात काही दिवसांपूर्वी अर्धवट सडलेला मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्याने गावात सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पोहचून तपासाला सुरुवात केली. चौकशीनंतर धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर मृतकाच्या आईला आणि त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

ही खळबळजनक घटना पंजाबच्या गुरदासपूर येथे घडली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलाला निर्दयी आईनं प्रियकराच्या मदतीनं जीवे मारलं आहे. २६ वर्षीय मुलाच्या हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नाल्यात सडवण्याचा प्रयत्न केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा आईच्या अनैतिक संबंधात बाधा बनत होता. त्यामुळे त्याला वाटेतून दूर करण्याचा डाव आईनं आखला. गुरदासपूरच्या एसएसपी नानक सिंग यांनी सांगितले की, आम्हाला गुरदासपूरच्या गावात अर्धवट सडलेला मृतदेह सापडला. त्यानंतर डीएसपी राजेश कक्कड यांच्या नेतृत्वात तपास पथक बनवलं. आम्ही या घटनेचा तपास केला तेव्हा असा खुलासा झाला की, मृत व्यक्तीच नाव रणदीप सिंह असून त्याचे वय २६ वर्ष होतं. तो बलवंडा गावात राहणारा होता. जेव्हा पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली तेव्हा कळालं की, रणदीपची आई रुपिन्दरजीत कौर आणि प्रियकर सुखविन्दर सिंग यांचे अनैतिक संबध होते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाच्या आईने प्रियकर सुखविन्दर सिंग आणि त्याचा एक साथीदार गुरजीत सिंग यांच्यासोबत मिळून स्वत:च्या २६ वर्षाच्या मुलाची हत्या केली. रुपिन्दरजीत कौर आणि सुखविन्दर सिंग यांचे संबंध होते. ही बाब मुलगा रणदीपला कळाल्यानंतर त्याने आईला विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे. अखेर या गोष्टीला कंटाळून आईने रणदीपचा काटा काढायचं ठरवलं. त्यासाठी तिने सुखविन्दर सिंग आणि त्याचा साथीदार गुरजीत सिंग यांची मदत घेतली. मुलाच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देत सडवण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी मृतकाची आई आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली असून त्याचा साथीदार गुरजीत त्याचा शोध पोलीस घेत आहेत.