वहिनीसोबत दीर अंथरूणावर दिसला, मोठ्या भावानं पाहिल्यावर ‘त्याचा’ जीवच काढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वहिनीबरोबर शारीरिक संबंध ठेवणे एक व्यक्तीला चांगलेच महागात पडले. वहिनीशीच शारीरिक संबंध ठेवणाऱ्या दिराने त्यांच्याच भावाची हत्या केली. उत्तरप्रदेशात गाजीपूरमध्ये छठ पूजेच्या दिवशी सुभाष नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. त्याचे डोकेच धडापासून वेगळे करण्यात आले होते.

या प्रकरणात पहिल्यांदा सुभाषच्या पत्नीने आणि त्याच्या छोट्या भावाने गावाच्या प्रधानावर हत्येचा आरोप लावला परंतू पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांनी सुभाषच्या हत्येचा खुलासा केला तेव्हा त्यांच्या छोट्या भावाला दिनेश रामला तर त्यांची पत्नी सुषमा आणि रामजीवन नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या मते हे सर्व प्रकरण अनैतिक संबंधाचे आहे. सुभाषने त्यांच्या पत्नीला आपल्या छोट्या भावासह अनैतिक संबंध प्रस्तापित करताना पाहिले होते. त्यानंतर वहिनी आणि दिराने रामजीवन या व्यक्तीच्या मदतीने सुभाषची हत्या केली.

2 नोव्हेंबरला छठ पूजेच्या दिवशी दिनेशने रामजीवनच्या मदतीने पहिल्यांदा आपल्या भावाला दारु पाजली त्यानंतर त्यांची हत्या केली. सुभाष दारु पिऊन घरी येत असत आणि पत्नीला मारहाण करत असतं, त्यादरम्यान दिराचे आणि वहिनेची अनैतिक संबंध निर्माण झाले होते. गावात राहणाऱ्या रामजीवनशी देखील या महिलेचे अनैतिक संबंध प्रस्तापित झाले होते.

त्यांच्या या अनैतिक संबंधाची माहिती सुभाषला झाली होती. त्यानंतर तिघांनी मिळून सुभाषला मार्गातून हटवण्याची योजना तयार केली आणि छठ पूजेच्या दिवशी सुभाषची हत्या केली. हत्येनंतर वहिनी आणि दिराने मिळून ग्रामप्रधानाला फसवण्याचा कट रचला आणि त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like