राम मंदिराबद्दल शिवसेनेची ‘सूचक’ जाहिरात

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अयोध्येत आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराच्या आठवणींना उजाळा देत ’हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे!’ अशा शिर्षकाची सूचक जाहिरात केली आहे. सामनामध्ये ही पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अयोध्येत निर्माण होणार्‍या रामलल्ला मंदिरासाठी शिवसेनेने केलेल्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही जाहिरात शिवसेनेचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. तर या फोटोमध्ये बाबरी मस्जिद विद्धवंसाचा फोटो वापरण्यात आला आहे.