१७०० कोटीच्या घोटाळ्यातील घोटाळेबाजाला ६०० कोटी देणार होते मंत्री, IAS अधिकाऱ्याने रोखले

बंगळुरू : पोलिसनामा ऑनलाईन –  इस्लामिक बँकेच्या नावावर जवळपास ३०, ००० मुस्लिमांची फसवणूक करणाऱ्या मोहम्‍मद मंसूर खान विषयी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. कर्नाटक सरकारमधील एक मंत्री मन्सूर खान यांना बेलआऊट पॅकेजच्या बदल्यात ६०० कोटी रुपये देणार होते. परंतु, एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांमुळे ही योजना अयशस्वी झाली.

मन्सूर खान याने दुबईला जाण्याच्या आधी एका मुस्लिम नेत्याच्या मदतीने एका मंत्र्याशी संपर्क साधला होता. पहिल्यांदा घोटाळ्याची रक्कम १५०० कोटी सांगितली जात होती. अधिक तपासानंतर १७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

मन्सूर यांच्यापुढील संकटे फेब्रुवारी पर्यंत खूप वाढली होती. त्यांनी लोनसाठी बँकेकडे मागणी देखील केली होती. बँकेने त्यांना अनापत्ति प्रमाण पत्र आणायला सांगितले होते. मन्सूर यांनी आपल्या मोठ्या ओळखीचा वापर करून noc प्रमाणपत्रात जुळवाजुळव देखील केली होती. पण या प्रकरणात एक प्रमुख अधिकाऱ्याने हे प्रकरण रोखले. त्यांनी सही करायला नकार दिला. मंत्र्याने अधिकाऱ्यावर खूप दबाव देखील आणला होता. परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.

कर्नाटक पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआईटी ची स्थापना केली आहे. मन्सूर खानने इस्लमिक बँकेच्या नावावर मुस्लिम लोकांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन एका खोट्या योजनेची सुरवात केली होती. मन्सूरने २००६ मध्ये आई मॉनेटरी अडवाइजरी (IMA) नावाची कंपनी स्थापन केली. यामध्ये त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते की, माझी कंपनी कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक करेल आणि गुंतवणूक दारांना ७ ते ८ % परतावा देईल. इस्लाम धर्मात व्याजातून मिळालेला पैसा धर्माच्या विरोधातील मानला जातो. त्याने धर्माचा वापर करून गुंतवणूक दारांनाच बिझनेस पार्टनर बनवले.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’