४० हजार मुस्लिम बांधवांना गंडा घालणारा मंसूर खान EDच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला नेहमीच सांगितले जाते की अधिक पैशांची हाव करू नये. परंतू आपली पैशांची हाव सुटत नाही हे ही तेवढेच खरे. अशाच एका हव्यासापोटी ४० हजार मुस्लिमांना करोडो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. ईडीने यासंदर्भात चौकशी करत यामागील मास्टर माइंड मंसूर खान याला अटक केली आहे.

मंसूर खान हा बंगळुरुमध्ये ‘आयएमए’ या नावाने बँक चालवण्याचे काम करत होता. २००६मध्ये चिटफंड सुरु करण्यात आला. यात तब्बल ४ हजार मुस्लिम लोकांकडून २ हजार कोटी रुपये गोळा करण्यात आलेल्या पैशांचा घोटाळा केला. त्यानंतर तो फरार होता. अनेक तक्रारी आल्यानंतर कर्नाटक पोलीसांनी यावर तपास केला. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले. आता ईडीने त्याला दुबईला ताब्यात घेत आता भारतात आणले आहे. मंसूर खान सध्या ईडीच्या ताब्यात आहे.

मंसूर खान याने आधी हा चीटफंड सुरु करून मोठ्या मौलानांशी संपर्क करुन त्यांना विश्वासात घेतले. त्यांना समजावून सांगितले की ही स्कीम मुस्लिम धर्मीयांसाठी चांगली असल्याचे सांगितलं. त्यानंतर या स्किममध्ये गुंतवणुक केल्यास अधिक फायदा होतो, असं सांगितलं. त्यानंतर त्याने काही काळ हे दाखवूनही दिले. यात अनेक श्रीमंत कुटुंबाना या स्किममध्ये घेतले. त्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हीडिओ बनवत अनेकांकडून पैसे लुटले. यात त्याने ४ हजार मुस्लिमांना फसवून त्यांचे २ हजार कोटीं घेऊन फरार झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like