IMA Vs Baba Ramdev : बाबा रामेदव यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, PM मोदींकडे मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून मागणी करण्यात आली आहे की, योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आरोप आहे की, रामदेव यांच्याकडून कोरोना लसीबाबत संभ्रम पसरवला जात असून चुकीचे वक्तव्य केले जात आहे. त्यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. आपल्या याच मागणीसाठी आयएमएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. जो वाद एक व्हॉट्सअप मेसेज वाचल्याने सुरू झाला होता, तो आता देशद्रोहापर्यंत पोहचला आहे. तमाम डॉक्टर यावेळी बाबा रामदेव यांच्यावर नाराज आहेत. तसेच त्यांचे वक्तव्य मनोबल खच्ची करण्याचे असल्याचे म्हणत आहेत.

काही दिवसांपूर्वी अ‍ॅलोपॅथीची थट्टा करणार्‍या रामदेव बाबांनी सराव सत्राच्या दरम्यान कोरोना व्हॅक्सीनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. वायरल व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की, – तिसरा म्हणाला मला डॉक्टर व्हायरचे आहे…टर…टर…टर…टर…टर…टर व्हायचे आहे. डॉक्टर…एक हजार डॉक्टर तर अद्याप कोरोनाची डबल व्हॅक्सीन घेऊनही मेले…किती…एक हजार डॉक्टर…कालची बातमी आहे…स्वताला वाचवू शकत नाही ती कसली डॉक्टरी.

बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
यापूर्वी बाबा रामदेव यांनी व्हॅट्सअपवर एक मेसेज ऐकवत अ‍ॅलोपॅथीला स्टुपिड आणि दिवाळखोर सायन्स म्हटले होते. त्यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेतले, परंतु तोपर्यंत वाद निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्यावर आयएमएने आक्षेप नोंदवला होता आणि देशाचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सुद्धा रामदेव यांना वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली होती.

एका व्हिडिओत बाबा रामदेव कोरोना व्हॅक्सीनची थट्टा करताना दिसले तर एका व्हिडिओमध्ये त्यांनी कोरोना रूग्णांवर सुद्धा वक्तव्य केले आहे. एका वायरल व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत की, रूग्णांना माहित नाही की, श्वास कसा घेतात, यामुळे ऑक्सीजनची तक्रार करतात, नकारात्मकता पसरवतात. त्यांच्या या वक्तव्यावर सुद्धा मोठा गोंधळ उडाला होता आणि सरकारला मोठी कारवाई करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप
यापूर्वी आयएमए उत्तराखंडकडून बाबा रामदेव यांच्याविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली होती. वक्तव्यात म्हटले होते की, आपली औषधे विकण्यासाठी रामदेव टीव्हीवर येऊन लसीकरणाचे साईड इफेक्ट होत असल्याची जाहिरात सुद्धा जारी करत आहेत, ते पॅथी आणि त्याच्या संबंधीत डॉक्टरांच्या विरूद्ध बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. याचसाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, यामुळे रामदेव बाबांच्या अडचणी वाढणार आहेत.