अंत्ययात्रेसाठी आलेल्या इमामने मृत व्यक्तीला पाहिलं जिवंत ; हार्ट अ‍ॅटॅकने जागीच मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मानवाने सर्व काही शोध लावले पण मृत्यू कोणत्या क्षणी, कधी येईल काही सांगता येत नाही. या जगाला कोण, कधी निरोप देईल हे कुणी सांगू शकत नाही. सौदी अरेबियाच्या माराकेचमध्येही अशीच एक घटना घडली. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मशिदीचा एक इमाम त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी आला. पण अंत्यसंस्काराच्या अगदी काही वेळ आधी मृत व्यक्ती जिवंत झाली. ते पाहून इमामला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तेथेच खाली पडला. इमामचा जागीच मृत्यू झाला.

‘इफ इन सौदी अरेबिया न्यूज’नुसार, माराकेच शहरातील एका उपचारादरम्यान रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एका व्यक्तीला मृत घोषित केले. ती जिवंत असताना तिच्या श्वासाची गती इतकी हळू होती की डॉक्टरांना वाटले की ती मेली आहे. डॉक्टरांनी त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्रही जाहीर केले. कुटुंबाने त्या मुस्लिम व्यक्तीच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू केली आणि त्यासाठी इमामलाही मशिदीतून बोलावले गेले. इमामने अंत्ययात्रेच्या तयारीसाठी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली पण तितक्यात मृत व्यक्ती जिवंत झाली. मृत व्यक्तीला पाहून इमाम इतके घाबरले की इमामला हृदयविकाराचा झटका आला. इमाम तेथेच खाली कोसळले. लोकांनी त्यांना दवाखान्यात नेले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेले लोक घाबरले होते.

आता ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक म्हणत आहेत की अल्लाहची इच्छेमुळे त्या इमामचा मृत्यू आहे. काही लोकांनी या इमामच्या मृत्यूबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि असे म्हटले की कोणालाही मृत्यूच्या अधीन केले जात नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like