महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार, 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपासून मान्सूनचे देशात आगमन झाले आहे.काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी लोकांना अजूनही दमट उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) देशातील सहा राज्यात मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यांच्या मते गुरुवार ते 6 जुलै या काळात या राज्यात मुसळधार पाऊस पडेल. ही सहा राज्ये म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि बिहार.

हवामान खात्याने बुधवारी 5 जुलैपर्यंत या सहा राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यांच्या मते, 6 जुलैपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 3 आणि 4 जुलै रोजी कोकण, गोवा आणि मध्य प्रदेशमधील अनेक ठिकाणी 200 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर गेल्या एक आठवड्यापासून उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात सक्रिय मान्सून काही प्रमाणात हलका पडला आहे. पण एक-दोन दिवसानंतर पुन्हा जास्त पडण्याची शक्यता आहे. विभागीय हवामान केंद्राच्या अहवालानुसार, गेल्या चोवीस तासांत राज्यातील पूर्व भागात काही ठिकाणी पाऊस पडला. त्याच वेळी, राज्याच्या पश्चिम भागात हवामान सामान्यतः कोरडे होते.

येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी, जोरदार वारा देखील येऊ शकतो. येत्या तीन जुलै रोजी पुन्हा पावसाने हजेरी लावली असून राज्याच्या पूर्वेकडील भागातील बहुतेक ठिकाणी तसेच पश्चिम भागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 जुलै रोजी राज्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like