IMD Alert | अरबी समुद्रात वेगाने वारे वाहण्याची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IMD Alert | मागील पंधरा दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy rain in Maharashtra) थैमान घातल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोकण आणि घाट माथ्यावर पावसाच्या सरी कोसळत (Rain Alert) आहेत. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात अशीच स्थिती (IMD Alert) राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट (Yellow alert) दिला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

आज (शनिवार) पुण्यासह (Pune) सातारा (Satara), रायगड (Raigad) , रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने (Mumbai Observatory) दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चार जिल्ह्यांत पुढील दोन-तीन तासांत वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्या संपूर्ण राज्यात पावसाची विश्रांती असेल. 4 जुलै पर्यंत राज्यात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

अरबी समुद्रात वेगावन वाऱ्यांची शक्यता

मागील आठवड्यात महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोपडल्यानंतर पावसानं उत्तर भारताकडे वाटचाल सुरु केली आहे. आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर अरबी समुद्रासह महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी परिसरात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये

काही ठिकाणी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारा वाहणा आहेत. तर काही ठिकाणी 60 किमी प्रतितास पेक्षा अधिक वेगाने वारा वाहू शकतो. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.

Web Title : IMD Alert | strong winds in north arabian sea maharashtra gujrat imd give yellow alert to ghat area including pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये;
फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ;
धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त;
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक !
पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR