शेतकरी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; हवामान खात्याने वर्तवला पावसाचा अंदाज 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाची वाट जेवढ्या आतूरतेने शेतकरी पाहत असतो, तितक्याच आतूरतेने हवामान खात्याकडून वर्तवण्यात येणाऱ्या अंदाजाची वाट पाहिली जाते. भारतीय हवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते. दरम्यान, सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर आज मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाच पाऊस पडेल. यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असला तरी नंतर तो क्षीण होईल. तसेच अखेरीपर्यंत मान्सून आपली सरासरी गाठेल, तसेच एकूण  सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईस असा अंदाज वर्तवला आहे.

यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था, ऑस्ट्रेलियन संस्था तसेच स्कायमेट यांनी व्यक्त केला आहे. स्कायमेटने यंदा ९३ टक्के पावसाची शक्यता वर्तववली आहे. त्यामुळे
गेल्या वर्षी भारतीय हवामान विभाग व स्कायमेटने ९७ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, २०१८ मध्ये सरासरीच्या ९१ टक्के पाऊस होऊन देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा पाऊस कसा असणार याविषयी उत्सुकता वाढली आहे.

Loading...
You might also like