IMD Heat Wave Alert | उष्णतेमुळे बिहारमध्ये 35 जणांचा मृत्यू; 200 जण रूग्णालयात दाखल, महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई/नवी दिल्ली : IMD Heat Wave Alert | उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) गेल्या तीन दिवसांत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू (Death) झाला आहे. हे मृत्यू उष्माघातामुळे (IMD Heat Wave Alert) झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यामागे दूषित पाणी हेही कारण असू शकते, असे यूपीतील एका वरिष्ठ सरकारी डॉक्टरांचे मत आहे. बलिया येथील पाण्याचे नमुने लवकरच तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. एकट्या यूपीतील बलिया जिल्ह्यात 54 जणांचा मृत्यू झाला, तर 400 हून अधिकांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, पाटणा (Patna) येथे गेल्या 24 तासांत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

 

सध्या यूपी बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात (North India) तापमानाचा पारा चढला आहे. भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) उत्तर प्रदेश-बिहार मधील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट (IMD Heat Wave Alert) जारी केला असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, हवामान खात्याने, 24 तास बिहारच्या बांका, जमुई, जहानाबाद, खगडिया, लखीसराय, नालंदा, नवादा, पटना, समस्तीपूर, शेखपुरामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave Alert) दिला. आरामध्ये उष्णतेमुळे आतापर्यंत 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला. वाढती उष्णता आणि उष्माघातामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

 

शाळा 24 जूनपर्यंत बंद –

पाटण्यात गेल्या 24 तासांत उष्माघातामुळे 35 जणांचा मृत्यू झाला. एनएमसीएच रुग्णालयात 19 जणांचा मृत्यू झाला तर पीएमसीएच रुग्णालयात 16 जणांचा मृत्यू झाला. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे 9 जणांचा मृत्यू झाला. बेगसराई, सासरा आणि नवाडा येथे प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला. उष्णतेच्या लाटेचा इशारा पाहता शाळांना सुटी (School Holidays) देण्यात आली आहे. पाटण्यातील शाळा दि. 24 जूनपर्यंत बंद राहणार आहेत. या शाळा दि. 19 जूनला सुरू होणार होत्या.

 

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही उष्णतेच्या लाटेचा इशारा –

हवामान खात्याने (IMD) पुढील 24 तास उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नियमावली जारी केली आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या विदर्भात (Vidarbha) उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

 

 

Web Title : IMD Heat Wave Alert | 35 die in Bihar due to heat; 200 people admitted to hospital,
heat wave warning for 11 districts of Maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा