Uddhav Thackeray : मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत येत्या 9 ते 12 जून या चार दिवसाच्या कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सर्व जिल्ह्याच्या यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या काळात कोरोनासह इतर कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवत अडथळा येणार नाही याची काळजी घ्या, असा सूचना दिल्या आहेत. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे असेही आदेशही मुख्यमंत्र्यांनी Uddhav Thackeray दिले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.

त्यावेळी ते बोलत होते. अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.

जनरेटर्स, डिझेल, ऑक्सिजनचा साठा करून ठेवावा, वीजेचे बॅकअप

कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी.

तसेच अतिवृष्टीमुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना अडचण होणार नाही,

पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

Also Read This : 

 

Chandrakant Patil | एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’

 

मेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण

 

शिवसेनेचे भाजपवर टीकेचे बाण, म्हणाले – ‘ट्विटरच्या अतिरकेचा वापर करूनच भाजपनं निवडणुका जिंकल्या, मग आता मोदी सरकारचा विरोध का?’

 

वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अ‍ॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या

‘पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती’, नितेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

 

शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या

 

Corona Vaccination | ‘कोविशील्ड’ घेतलेल्यांना मोठा दिलासा तर ‘कोव्हॅक्सिन’ अन् ‘स्पुटनिक’ लस घेतलेल्यांना धक्का, जाणून घ्या

 

दररोज 1 ग्लास दूध पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो? संशोधनावरील तज्ञांचे मत जाणून घ्या

 

कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का?