बळीराजासाठी सुखवार्ता यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
बळीराजाला सुखावणारीआनंद वार्ता स्कायमेटनंतर लगेचच भारतीय हवामान विभागाने(आयएमडी) दिली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या ९७ टक्के पर्जन्यवृष्टी होणार आहे. ही माहिती भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषद सविस्तर दिली. आयएमडीने गेल्या वर्षी 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला.

स्कायमेटचा अंदाज
स्कायमेटने काही दिवसांपूर्वीच वर्तवलेल्या अंदाजानुसार देशभरात यंदा समाधानकारक मान्सून आहे.सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. स्कायमेटने दिलेल्या अधिकृत वृत्तात यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असे म्हटले होते. महाराष्ट्रात पाऊसमान उत्तम असल्याचेही नमूद केले होते.

 

Loading...
You might also like