भारतीय हवामान खात्याचा सुधारीत अंदाज ! यंदा 101 टक्के पाऊस पडणार, जाणून घ्या कोणत्या भागात किती पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने (IMD) यंदा मान्सून  सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.

कोणत्या भागात किती पाऊस ?
भारतात यंदा मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92 ते 108 टक्के इतका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दख्खनच्या पठारावर 91 ते 107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भागात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानं IMD वर्तवलेला हा अंदाज जून ते सप्टेंबर महिन्यासाठीचा आहे.

मान्सून केरळला कधी पोहोचणार ?
भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 3 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हावामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असे सांगितले होते.

पहिला अंदाज काय होता ?
गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101 टक्के असेल असे सांगण्यात आले आहे. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सूनला होणार आहे. त्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त