यंदा मोठ्या प्रमाणात बसणार उष्णतेच्या ‘झळा’, असं असेल ‘वातावरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान खात्याने या वर्षीच्या मार्च ते मे या कालावधीत सर्वांत जास्त उष्णता राहणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत उष्णतेची तीव्रता अधिक वाढणार असून, याचा फटका उत्तर-पश्चिम,पश्चिम मध्ये आणि दक्षिण भारतात सर्वाधिक बसणार आहे. हवामान खात्याने मंगळवारी सांगितले की, मार्च ते मे दरम्यानच्या उन्हाळ्यातील सरासरी तापमान मागील वर्षाच्या तुलनेत जास्त राहील.

या राज्यातील लोकांना फुटणार घाम
हवामान खात्याच्या अहवालानुसार पंजाब, हरियाणा आणि मध्य भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश तसेच पश्चिम भारतामध्ये गुजरात,महाराष्ट्र या राज्यांमध्ये नेहमीच्या तापमानापेक्षा जास्त तापमान राहणार आहे. थंड हवामान असणाऱ्या राज्यांमध्ये मार्च ते मे महिन्या दरम्यान तापमान हे ०.५ डिग्री सेल्सियस इतके राहणार आहे.

उष्णता तोडणार सर्व रेकॉर्ड
दिल्ली ,जम्मू-काश्मीर, हरियाणा, चंडीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, उप-हिमालय, पश्चिम बंगाल, सौराष्ट्र आणि गुजरात, कोकण तसेच गोवा आणि कच्छ या भागांत उष्णतेची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटकसह केरळ राज्यांत देखील या मार्च ते मे महिन्या दरम्यान उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. देशातील अन्य राज्यांत तापमान हे -0.5 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहील, पण सर्वाधिक राज्यांना उष्णतेची झळ बसणार आहे.

पावसाळ्याबद्दल आहे चांगली बातमी
यंदाचा पावसाळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे. एप्रिल महिन्यात हवामान खाते आपला मान्सून अहवाल सादर करेल. देशातील जे प्रमुख जलाशय आहेत त्यांमध्ये सध्या १०१.८७ अब्ज घनमीटर इतकी पाण्याची पातळी आहे. यंदाची पाणी पातळी ही मागच्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्के जास्त आहे.

गेल्या वर्षी मोडला होता 25 वर्षांचा विक्रम
जून ते सप्टेंबर २०१९ दरम्यान देशात सरासरीपेक्षा १० टक्के जास्त पाऊस पडला होता आणि हा पाऊस मागच्या २५ वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. गेल्या वर्षी अनेक राज्यांत महापूर आला होता, त्यामुळे अनेक शहरे उध्वस्त झाली होती. महाराष्ट्र्र, मध्ये प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील खरीप पिकला मोठा फटका बसला होता.