भारतीयांसाठी खुशखबर ! आर्थिक ‘मंदी’ काही काळासाठीच, लवकरच ‘ग्रोथ’ होणार असल्याचं IMP प्रमुख क्रिस्टालिनांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) च्या ५० व्या वार्षिक बैठकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF ) ची प्रमुख क्रिस्टलिना जियॉर्जिवा यांनी म्हटले आहे की, भारतातील आर्थिक मंदी काही दिवसांसाठी आहे. आगामी काळात पुन्हा वेगवान आर्थिक विकासाची आशा आहे. या आठवड्यात आयएमएफने २०१९ च्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी करून ४.८ टक्के केला होता. आयएमएफच्या चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांनीही म्हटले की, २०२० मध्ये जागतिक वाढीची गती अद्याप अनिश्चित आहे. ब्राझील, भारत आणि मेक्सिको सारखे देश क्षमतानुसार कामगिरी करत नाहीत हे त्यांनी सांगितले.

क्रिस्टलिना जियॉर्जिवा म्हणाल्या कि, ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर जगाचे सहमती असणे चांगले आहे. त्या म्हणाला, जगातील ३.३ टक्के जागतिक आर्थिक वाढ सर्वोत्तम आहे.

जगातील अनेक बड्या एजन्सींनी भारताचा जीडीपी अंदाज कमी केला आहे :
IMF – मागील वेळी ६ टक्के जीडीपी अंदाज, सध्या ४.८ टक्के अंदाज
SBI रिसर्च – मागे ५ टक्के जीडीपी अंदाज, आता ४.६ टक्के
Fitch – ५.६ टक्के जीडीपी मागील वेळी अंदाजित होता, आता ४.६ टक्के अंदाज
ADB – मागील वेळी जीडीपीचा ६.५ टक्के अंदाज, आता ५.१ टक्के
World Bank – मागील अंदाज ६ टक्के जीडीपी, आता ५टक्के
RBI – जीडीपी ६.१ टक्के अंदाज, आता ५ टक्के अंदाज

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like