home page top 1

आर्थिक मंदीच्या विळख्यात 90 % देश, भारतवर सर्वाधिक परिणाम : IMF प्रमुख

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आर्थिक मंदीचा इशारा दिला आहे. सध्या आर्थिक मंदीच्या विळख्यात 90 % असून त्यांचा विकास दर कमी होत आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगवान उदयोन्मुख असल्याने त्यावर मंदीचा इतर देशांपेक्षा अधिक परिणाम होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्था सध्या सुस्त स्थितीत आहे. अशी माहिती आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी दिली आहे.

जॉर्जिएवा म्हणाल्या की, ‘एकाच वेळी अनेक घटकांमुळे जागतिक अर्थव्यवस्था संक्रमित होत आहे. या दशकाच्या सुरूवातीपासूनच जगाचा विकास दर सर्वात खालच्या पातळीवर जाईल. त्यामुळे जगातील 90 टक्के अर्थव्यवस्था 2019 मध्ये मंदीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.’

जागतिक वाढीचा दरही कमी होणार –
आयएमएफ सध्याच्या आणि पुढच्या वर्षीच्या वाढीचा दर कमी करत आहे. आयएमएफ याविषयी 15 ऑक्टोबर रोजी अधिकृत सुधारित आकडेवारी जाहीर करेल. आयएमएफने यापूर्वी 2019 मध्ये 3.2 टक्के आणि 2020 मध्ये 3.5 टक्के वाढीचा अंदाज लावला होता. सुमारे 40 उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये वास्तविक जीडीपी विकास दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक असेल.

भारत आणि ब्राझीलमध्ये मंदी अधिक –
आयएमएफने म्हटले आहे की , अमेरिका आणि जर्मनीमधील बेरोजगारीचा दर निच्चांकी पातळीवर आहे. असे असतानाही अमेरिका आणि जपानसह युरोपच्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक हालचाली संथ होत आहेत. भारत आणि ब्राझिलसारख्या मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदीचा परिणाम अधिक दिसून येत आहे. चीनचा आर्थिक विकास दरही हळू कमी होत आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like