तहसिलदारांना उद्धट बोलणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-शिरुरचे तहसिलदार आणि तलाठी यांना उद्धट बोलणाऱ्या पोलीस हवालदाराला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार के.पी. कानगुडे यांच्या निलंबनाचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

पोलीस हवालदार के.पी. कानगुडे हे शिक्रापुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.  १ नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता कानगुडे यांनी तहसिलदार आणि तलाठ्यांसोबत असभ्य व उद्धटपटे वर्तन केले. त्यांनी केलेले वर्तन हे शासकीय सेवकास शोभणारे नाही. त्यामुळे त्यांच्यावर बेशिस्त व बेजबाबदारपणे वर्तवणुक केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कानगुडे यांचयावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांना शासकीय सेवेतून तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. तसेच त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. कानगुडे यांच्या निलंबनामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे उद्धट आणि बेशिस्त वागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आळा बसेल अशी चर्चा सध्या पोलीस दलात आहे.