खुशखबर ! ‘तात्काळ’ भरून घ्या आपल्या गाडीची ‘टाकी’, 6 महिन्यातील सर्वात ‘स्वस्त’ झालं ‘पेट्रोल-डिझेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गाडी चालवणार्‍यांनी लवकर टाकी फुल करून घ्यावी, कारण पेट्रोलच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, या किमती पुन्हा वाढू शकतात. यासाठी ही घाई करू शकता. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्याने देशात पेट्रोलचे दर लागोपाठ दुसर्‍या दिवशी घटून सुमारे सहा महिने आणि डिझेलच्या किमती लागोपाठ चौथ्या दिवशी घसरून आठ महिन्यातील सर्वात खालच्या पातळीवर पोहचल्या आहेत.

शहर                पेट्रोल                            डीजल
दिल्ली –        71.71 रुपये प्रति लीटर     64.30 रुपये प्रति लीटर
कोलकाता – 74.38 रुपये प्रति लीटर    66.63 रुपये प्रति लीटर
चेन्नई –         74.51 रुपये प्रति लीटर     67.86 रुपये प्रति लीटर
मुंबई –         77.40 रुपये प्रति लीटर     67.34 रुपये प्रति लीटर

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रविवारी पेट्रोल 18 पैसे स्वस्त होऊन 71.71 रुपये प्रति लीटर झाले आहे. हा 09 सप्टेंबर 2019 नंतरचा सर्वात खालचा स्तर आहे. येथे डिझेल सुद्धा 21 पैशांनी घसरून 64.30 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. मागच्या वर्षी 1 जुलैनंतरचा हा सर्वात खालचा स्तर आहे.

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.