Immoral Relationship | अनैतिक संबंधातून जुन्या ‘भिडू’चा नव्या प्रियकराच्या मदतीनं काढला ‘काटा’, प्रेयसीकडून 42 वर्षीय बॉयफ्रेन्डची ‘गेम’; महाराष्ट्रातील घटना

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Immoral Relationship | अनैतिक संबंधातून नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराचा प्रियसीने काटा काढल्याची घटना चाकूर (Chakur) परिसरात उघडकीस आली आहे. जुन्या प्रियकराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यानंतर त्याच्यावर लोखंडी रॉडने घाव घालून खून (Murder in Latur) केला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. हणमंत व्यंकटी येरवे (वय ४२ ) असं हत्या झालेल्याचे नाव आहे. (Immoral Relationship)

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हणमंत याचे लातूर रोड परिसरातील गेल्या दहा वर्षांपासून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. कालांतराने दारू पिऊन संबंधित महिलेला हणमंतने त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकदा मारहाण देखील केली. सततच्या या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेचे संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि संबंधित महिलेची जवळीकता वाढत गेली तर दुसरीकडे हणमंतचाही त्रास काही कमी झाला नाही. यामुळे महिलेनं आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची हत्या करण्याचा कट रचला. रविवारी सायंकाळी चाकूर येथे महिलेने दुचाकीवरून हणमंतला आणल. (Immoral Relationship)

 

 

याठिकाणी आरोपी महिलेनं एकाला फोन केला आणि हणमंतला मोहदळ भागातील एका आडवळणावर घेऊन गेली.
त्या ठिकाणी आधीपासून दबा धरून बसलेल्या संतोष आणि त्याच्या एका साथीदाराने हणमंतच्या डोळ्यात मिरची पूड टाकली.
त्यानंतर लोखंडी रॉडने सपासप वार केले. यामध्ये हणमंतचा जागीच मृत्यू झाला.
आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. सोमवारी सकाळी एका शेतकऱ्याला हा मृतदेह दिसल्यानंतर घटना उघडकीस आली आहे.
Immoral Relationship पोलिसांनी २४ तासात गुन्ह्याचा तपास करून महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

 

Web Title :- Immoral Relationship | girlfriend killed boyfriend in immoral relationship attack with iron rod in chakur of latur district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा