अनैतिक संबधातून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरला

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन – विवाहबाह्य संबधातून प्रियकराने ग्रॅन्डरच्या साहाय्याने प्रेयसीच्या गळा चिरून खून केला. अंबरनाथमधील प्रसादम रेसिडेन्सीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जयंती सहा असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ औद्योगिक वसाहातीमधील एका खाजगी कंपनीत अजित सहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. मात्र संदीपचे अजित सहा याची पत्नी जयंती सोबत विवाहबाह्य संबध होते. मात्र या संबंधांना जयंतीचा पती अजित सहा यांनी विरोध केला होता. मात्र कालांतराने त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट झाल्याने ते अजितच्या नकळत देखील भेटू लागले. दरम्यान ही महिला 17 तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर गुरुवारी जयंती आणि तिचा प्रियकर संदीप यांचे मृतदेह अंबरनाथमध्ये सापडले आहेत. ग्रॅन्डरचा वापर करून प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा चिरला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.