बीड : पती ठरत होता अनैतिक संबंधांमध्ये अडसर पत्नीने प्रियकरासह केलं असं काही…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –   बीडच्या गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आता या व्यक्तीची हत्या अनैतिक संबंधातून केल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी हे प्रकरण अवघ्या 24 तासांत मार्गी लावले.

ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असे 32 वर्षीय खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी होता. ज्ञानेश्वरचा मृतदेह राजापूर शिवारातील एका शेतात शनिवारी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तसेच गळ्याभोवती फास दिल्याचे व्रणही होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली.

ज्ञानेश्वरला दोन बायक्या होत्या. त्याच्या पहिल्या बायकोचे आरोपी नाना अप्पा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. पण ज्ञानेश्वर हा त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे ज्ञानेश्वरची पहिली पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्याला ठार मारण्याचा कट रचला आणि त्याचा खून केला.