इम्यून सिस्टम डॅमेज करतात ‘ही’ खास डाएट, संशोधकांनी केले सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही प्रकारच्या आजारापासून दूर राहण्यासाठी शरीराची इम्यून सिस्टम मजबूत असणे आवश्यक आहे. अनेक नवीन संशोधनात सांगितले आहे की, एका खास प्रकारच्या डाएटमुळे इम्यून सिस्टम खराब होत आहे. स्टडीनुसार फ्रक्टोज डाएटची जास्त मात्रा इम्यून सिस्टमला योग्य प्रकारे काम करण्यापासून रोखते.

हा स्टडी यूकेच्या स्वांजी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि फ्रान्सिस क्रिक इन्स्टीट्यूटच्या शास्त्रज्ञांच्या सोबत मिळून केला आहे. हा स्टडी नेचर कम्युनिकेशन्स जनरलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

फ्रक्टोज सामान्यपणे गोड ड्रिंक्स, मिठाई आणि प्रोसेस्ड फूडमध्ये आढळते. फूड प्रॉडक्शनमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. याचा लठ्ठपणा, टाइप 2 डायबिटीज आणि नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हरशी संबंध असल्याचे म्हटले जाते. मागील काही वर्षात संपूर्ण जगात फ्रक्टोज डाएट घेणार्‍यांची संख्या वाढली आहे. फ्रक्टोजबाबत लोकांना खुप कमी माहिती आहे.

नव्या स्टडीमध्ये समोर आले आहे की, फ्रक्टोजमुळे इम्यून सिस्टममध्ये सजू येते. या सूजमुळे इम्यून सिस्टमच्या पेशी आणि उती खराब होऊ लागतात आणि यामुळे शरीराचे अवयव आणि बॉडी सिस्टमला सपोर्ट करू शकत नाही.

इम्यून सिस्टम योग्य प्रकारे काम न करू शकल्याने शरीराला एखाद्या आजरांशी लढताना मोठ्या अडचणी येतात. या स्टडीमध्ये डायबिटीज आणि लठ्ठपणाला फ्रक्टोज डाएटशी जोडून समजण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

स्वांजी यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर निक जोन्स यांचे म्हणणे आहे की, डाएटच्या अनेक कॉम्पोनंटवर संशोधन केल्यानंतर आम्ही हे जाणून घेण्यास मदत झाली की, कोणत्या कारणामुळे सूज आणि आजार वाढू शकतो आणि यास कशाप्रकारे ठिक केले जाऊ शकते.

स्टडीमध्ये सहभागी एक अन्य शास्त्रज्ञ डॉक्टर एम्मा विन्सेट यांनी म्हटले, आमचा स्टडी यासाठी महत्वाचा आहे कारण तो समजावतो की, अखेर एखादा खास डाएट घेतल्याने लोक आजारी का पडतात.

प्रोसेस्ड फूड आणि गोड वस्तूंशिवाय फ्रक्टोज नैसर्गिकरित्या सफरचंद, सफरचंदचा ज्यूस, ड्राय अंजीर, मध, गुळ, ड्राय आलू बुखारा, शतावरी आणि कांद्यात आढळते. मात्र, योग्य मात्रेत नॅचरल फ्रक्टोज शरीराला नुकसान पोहचवत नाहीत.