‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

नवी दिल्ली : आरोग्य संघटनेने अ‍ॅडव्हायजरी जारी करून लोकांना मर्यादित प्रमाणात साखर आणि मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, रोजच्या जीवनात अशा अनेक वस्तू असतात ज्यांच्या अति सेवनाने इम्यून सिस्टम (Immune system) कमजोर होते. यासाठी खाण्या-पिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करा

तज्ज्ञांनुसार मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने अनुकूल प्रभाव पडतो. शुगर रिच वस्तू सेवन केल्याने ब्लड शुगर वाढते. सोबतच इम्फ्लेमेटरी प्रोटीनचे उत्सर्जन होते. ज्यामुळे इम्यून सिस्टमवर परिणाम होतो. रक्तात साखरेचा स्तर वाढल्याने आरोग्यावर प्रतिकुल प्रभाव पडतो.

मर्यादित प्रमाणात सेवन करा मीठ

पॅक चिप्स, बेकरी आयटम्स, फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंमध्ये मीठ अति प्रमाणात असते. शरीरात अति प्रमाणात मीठ सूज वाढवते. सोबतच ऑटोइम्यून आजारांचा धोका वाढतो. मीठाच्या अति सेवनाने इम्यून सिस्टम आणि गुड बॅक्टेरियांवर सुद्धा वाईट परिणाम होतो. यासाठी मर्यादित प्रमाणात मीठ सेवन करा.

फ्राईड फूड्स खाऊ नका

डॉक्टर नेहमी फ्राईड फूड न खाण्याचा सल्ला देतात. कारण याचा शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो. जंक फूड खाल्ल्याने इम्यून सिस्टम (Immune system) कमजोर होते. यासाठी फ्रेंच फ्राईस, पोटॅटो चिप्स, फ्राईड चिकन इत्यादी वस्तू खाणे टाळा.

कॉफीचे जास्त सेवन करू नका

चहा Tea आणि कॉफीत एँटीऑक्सीडेंट आढळतात, जे आरोग्यासाठी लाभदायक असतात. मात्र, अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे इम्यून सिस्टम कमजोर होते. सोबतच झोप खराब होते. यासाठी मर्यादित प्रमाणात रोज चहा किंवा कॉफी प्या.

हे देखील वाचा

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

 

मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या

 

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

 

रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Immune system | due to excessive consumption of these things can weaken immune system take these precautions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update