Immune System : शरीरात रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे की जास्त?, जाणून घ्या कसे ओळखाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत तीव्र असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहेत. काही जण आयुर्वेदिक औषधे, त्याचबरोबर विविध औषधी वनस्पतींचा काढा घेत आहे. याशिवाय काही जण तज्ञांचे मार्गदर्शनही घेत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असून अशा व्यक्तींनी घराबाहेर जाऊ नये, सुरक्षेच्यादृष्टीने सर्व काळजी घ्यावी असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

तज्ञांच्या मतानूसार शरीरातील पांढऱ्या पेशी, ॲटीबॉडीज आणि इतर अनेक तत्व मिळून रोगप्रतिकार शक्ती तयार होत असते. आणि हीच शक्ती आपल्याला व्हायरसपासून संरक्षण करत असते. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते असे लोक वातावरणात थोडा जरी बदल झाला तर लगेच आजारी पडतात. कोरोना काळात तर या रोगप्रतिकार शक्तीवर चर्चा होताना दिसत आहे. योगा, व्यायाम, चांगल जेवण यांमुळे ही शक्ती वाढवण्यास मदत होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

कशी ओळखणार कमजोर रोगप्रतिकार शक्ती

कमजोर रोग प्रतिकार शक्ती ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. कमजोर रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्या लोकांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येत असतात. रात्री पूर्ण झोप घेऊनही ताजेतवाणे न वाटणे, दिवसभर सतत थकवा जाणवणे, झोप येत राहणे अशी काही लक्षणे आढळतात. त्याचबरोबर अन्न पचन क्षमता कमजोर असल्याने पोटाशी संबंधित समस्या येत असतात. अशा लोकांच्या शरीरावर वातावरणातील बदलांचा लवकर परिणाम होतो. त्यांना लगेचच खोकला, सर्दीताप आणि येत असतो. आणखी एक मह त्त्वाच लक्षण म्हणजे चिडचिडा स्वभाव. कमजोर रोग प्रतिकार शक्ती असणारे लोक कोणात्या ना कोणत्या कारणाने वारंवार चिडचिड करत असतात.

कशी ओळखणार चांगली रोगप्रतिकार शक्ती?

साध्या व्हारल इन्फेक्शनमध्येही चांगल्या रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्या लोकांना औषधं घेण्याची गरज पडत नाही. त्यांना सर्दी, खोकला येतो, परंतु, तो फार काळ नसतो. त्यातून ते लगेच बरे होतात. त्याचबरोबर छोट्या आजारातून असे लोक पटकन बरे होतात.